डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी काय भाव मिळणार? कृषी तज्ञांचा अंदाज काय सांगतो, वाचा…

Published on -

Soybean Rate : या हंगामात सोयाबीनच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. विजयादशमीपासून राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली असून गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये सोयाबीनची आवक सतत वाढत आहे.

विशेष म्हणजे येत्या काळात सोयाबीनची आवक आणखी वाढणार आहे. यामुळे सोयाबीनचा बाजार डिसेंबर मध्ये कसा राहणार, सोयाबीनला या महिन्यात सरासरी काय भाव मिळणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

खरे तर या हंगामात सोयाबीनचे उत्पादन जवळपास 21 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर देखील सोयाबीनचे उत्पादन यंदा 0.3 टक्क्यांनी कमी राहणार असा अंदाज देण्यात आला आहे.

त्यामुळे यंदा सोयाबीनला चांगला दर मिळणार अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पण सध्या तरी सोयाबीनला शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढा दर मिळत नाहीये आणि यामुळे शेतकरी नाराज आहे. दरम्यान, आता आपण डिसेंबर 2025 मध्ये सोयाबीनला सरासरी काय भाव मिळणार याबाबत माहिती पाहूयात. 

डिसेंबर महिन्यात सोयाबीनला काय दर मिळणार

गेल्या तीन वर्षांमध्ये डिसेंबर महिन्यात सोयाबीनला काय सरासरी भाव मिळाला आहे याबाबत माहिती पाहुयात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की डिसेंबर 2024 मध्ये सोयाबीनला 4143 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळाला होता.

2023 च्या डिसेंबर मध्ये सोयाबीनला 4,831 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. पण 2022 च्या डिसेंबर मध्ये सोयाबीनला सर्वाधिक 5,556 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता.

दरम्यान मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षकडून डिसेंबर महिन्यात यावर्षी सोयाबीनला सरासरी काय भाव मिळणार याबाबत अंदाज देण्यात आला आहे.

या महिन्यात FAQ ग्रेडच्या सोयाबीनला सरासरी 4,515 ते 4,815 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe