वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट झाला कन्फर्म ? ‘या’ मार्गावर धावणार देशातील पहिली स्लीपर वंदे भारत, रूट पहा..

Published on -

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता रेल्वे प्रवाशांसाठी या गाडीचे स्लीपर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. खरंतर स्लीपर वंदे भारतची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सद्यस्थितीला देशात चेअर कार प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

ही वंदे भारत देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावत आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आत्तापर्यंत एकूण बारा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत आणि नजीकच्या भविष्यात राज्याला आणखी काही गाड्यांची भेट मिळणार असल्याचा दावा केला जातोय.

महत्त्वाची बाब म्हणजे सध्या ज्या मार्गांवर वंदे भारत सुरू आहे, त्या ठिकाणी प्रवाशांकडून या गाडीला चांगला प्रतिसादही मिळतोय आणि या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद झाला आहे.

पण चेअरकार प्रकारातील वंदे भारत फक्त दिवसा धावते. लॉंग रूटवर आणि रात्रीच्या प्रवासासाठी ही गाडी उपयुक्त नाही. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि रात्रीच्या प्रवासासाठी या गाडीच्या स्लीपर व्हर्जन ची गरज भासू लागली होती आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हीच गरज ओळखून आता स्लीपर वंदे भारत सुरू केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये ही गाडी प्रत्यक्षात रुळावर धावणार आहे. स्वतः केंद्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून तसेच संकेत मिळत आहेत.

जसं की आपणास ठाऊकच आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अनेक जण बाहेर पिकनिकसाठी निघतात. यामुळे जर तुम्हीही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी ही एक दिलासाची बातमी राहणार आहे.

स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस डिसेंबरपर्यंत पूर्णपणे तयार होईल.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विकसित केलेल्या या नवीन स्लीपर वंदे भारतमध्ये आधुनिक सुविधा, आरामदायी कोचेस आणि उच्च वेगाने धावण्याची क्षमता असेल. रेल्वे मंत्रालयानुसार या सेवेसाठी दोन ट्रेन सेट आवश्यक आहेत. त्यापैकी एक सेट आधीच पूर्ण झाला असून दुसऱ्या सेटचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

भारतातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या दोन मार्गांवर ही गाडी चालवली जाऊ शकते. दिल्ली–मुंबई आणि दिल्ली–कोलकाता या मार्गांवर ही ट्रेन चालवण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली असल्याचा दावा केला जात आहे. रेल्वे अधिकारी दिलीप कुमार यांनी सांगितले की, रेल्वे मंत्र्यांच्या सूचनांनुसार या प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे.

पहिल्या सेटमध्ये केलेल्या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर आता त्याची ट्रायल घेण्यात येणार आहे. दुसरा सेटही पूर्णतः तयार असल्याने प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आगामी काळात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe