शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मीशो लिमिटेडचा IPO उद्यापासून खुला होणार

Published on -

Meesho IPO : शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर गेल्या काही महिन्यात बाजारात अनेक आयपीओ लाँच झाले आहेत आणि गुंतवणूकदारांना यातून चांगला फायदा सुद्धा झाला आहे. दरम्यान आता डिसेंबर महिना सुद्धा गुंतवणूकदारांसाठी तितकाच खास ठरणार आहे.

कारण या महिन्याच्या सुरुवातीलाच 2015 मध्ये सुरु झालेल्या एका बड्या कंपनीचा आयपीओ येणार आहे. खरंतर उद्यापासून ई-कॉमर्स क्षेत्रातील जलद गतीने वाढणारी कंपनी मीशो लिमिटेडचा आयपीओ खुला होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या आयपीओची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा होती आणि आता उद्यापासून हा आयपीओ खुला होत असल्याने पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कंपनीने प्रति शेअर्स 105 ते 111 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला असल्याची माहिती समोर येत आहे.

हा IPO नवीन शेअर्स जारी करणे आणि मौजूदा शेअरधारकांकडून ऑफर फॉर सेल (OFS) अशा दोन्ही मार्गांनी राबवला जात असून याच्या माध्यमातून एकूण 5,421.20 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

या आयपीओच्या माध्यमातून  4,250 कोटींचे शेअर्स नव्याने जारी केले जाणार आहेत, तर उर्वरित 1,171.20 कोटी मूल्याचे शेअर्स विद्यमान गुंतवणूकदारांकडून विकले जाणार आहेत.

मीशोचे शेअर्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही प्रमुख स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहेत.

ग्रे मार्केटमधील कामगिरी कशी राहिली 

शेअर मार्केट गुंतवणूकदारांमध्ये या IPO ला मोठी मागणी दिसून येत असून, त्याचा प्रत्यय ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) मधूनही मिळतोय. बाजारातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आज मीशोच्या अनलिस्टेड शेअर्सना 42 चा प्रीमियम मिळत आहे.

यावरून गुंतवणूकदारांचा या आयपीओकडे मोठा सकारात्मक कल असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच लिस्टिंगच्या दिवशी शेअरला मजबूत सुरुवात मिळण्याची शक्यता पण वर्तवली जात आहे. आता आपण या आयपीओच्या काही महत्त्वाच्या तारखाबाबत माहिती पाहणार आहोत. 

हा आयपीओ तीन डिसेंबर 2025 रोजी सबस्क्रीप्शन साठी खुला होईल आणि 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होणार आहे. यासाठीची किमान लॉट साइज 135 शेअर्सची आहे. तसेच याच्या शेअर वाटपाची संभाव्य तारीख 6 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

पण, 6 डिसेंबर रोजी शनिवार असल्याने विलंब झाल्यास वाटप 8 डिसेंबर 2025 ला ढकलले जाणार अशी शक्यता आहे. तसेच या शेअर्सच्या लिस्टिंगची संभाव्य तारीख 10 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News