Moto Signature News : नवीन स्मार्टफोन खरेदी करणार आहात का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. मोटोरोलाने आपला नवीन प्रीमियम स्मार्टफोन Moto X70 Air Pro अधिकृतपणे लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झालाय.
त्यामुळे आता हा हँडसेट भारतात कधी लॉन्च होणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. कंपनीने स्वतः भारतात या फोनच्या लॉन्चिंगची माहिती दिली आहे.

हा फोन भारतात “Motorola Signature” या नावाने 23 जानेवारी 2026 रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
विशेष म्हणजे, हा Motorola च्या Signature प्रीमियम सीरिजमधील पहिलाच स्मार्टफोन असून 2026 मध्ये फ्लॅगशिप दर्जाचा परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट कॅमेरा अनुभव देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
Moto X70 Air Pro मध्ये अत्यंत शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर हाय-एंड गेमिंग, मल्टीटास्किंग तसेच AI-आधारित फीचर्स सहज हाताळण्यास सक्षम आहे.
फोन Android 16 आधारित Motorola Hello UX वर चालतो आणि तब्बल 7 वर्षांचे OS व सिक्युरिटी अपडेट्स मिळणार असल्याने दीर्घकाळ वापरासाठी हा फोन तयार आहे.
किंमत आणि भारतातील अपेक्षा
चीनमध्ये Moto X70 Air Pro च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4,499 (सुमारे 58,900 रुपये) ठेवण्यात आली आहे. याशिवाय 12GB/512GB आणि 16GB/1TB हे दोन पर्याय उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे सुमारे 65,400 रुपये आणि 71,950 रुपये आहे.
भारतामध्ये हा फोन 59,999 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता असून, उच्च स्टोरेज व्हेरिएंट्स 64,999 ते 69,999 रुपये दरम्यान असू शकतात. बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्सही मिळण्याची अपेक्षा आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Moto X70 Air Pro मध्ये 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, त्याला 1.5K रिझोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट आहे. फोनला Gorilla Glass Victus 2 संरक्षण, अॅल्युमिनियम फ्रेम आणि प्रीमियम फिनिश देण्यात आली आहे.
कॅमेरा विभागात हा फोन विशेष ठरतो. मागील बाजूस 50MP Sony LYT-828 प्रायमरी कॅमेरा (OIS सह), 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो (3x ऑप्टिकल झूम) देण्यात आला आहे. फ्रंटला 50MP Sony LYT-500 सेल्फी कॅमेरा आहे.
यामध्ये 5200mAh बॅटरी, 90W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग, तसेच IP68/IP69 रेटिंग आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. एकूणच, Moto X70 Air Pro हा 2026 मधील एक दमदार प्रीमियम स्मार्टफोन ठरण्याची दाट शक्यता आहे.













