file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :-  पुण्यातील गंगाधाम येथील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी मोठ्या प्रमाणात पसरली आहे की ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची तब्बल १४ वाहने घटनास्थळी दाखल झाली

असून त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

गंगाधाम येथील आई माता मंदिराजवळ असलेल्या श्री जी लॉन्स येथील फर्निचरच्या गोदामाला साडेआठ वाजता आग लागल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत या आगीने रौद्ररूप धारण केले होते.

त्यामुळे आणखी चार गाड्या मागविण्यात आल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून नेमकी आग कशामुळे लागली.

हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. तसेच आतमध्ये कोणी आहे का याचा देखील शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.