Ahilyanagar News : शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी ; ‘या’ वेळेत आता दर्शन राहणार बंद

Published on -

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने शनिभक्तांना सूचित करण्यात आले आहे की, श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळ व शिंगणापूर ग्रामस्थ यांच्यात दि. 27 मे रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 11 जून 2025 पासून स्वच्छता व सुरक्षेच्या कारणास्तव शनि मंदिर रात्री 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु शनिअमावस्या, गुढीपाडवा, शनिजयंती इ. उत्सवाचे दिवशी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहील अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी याबाबत माहिती दिली.

शनिशिंगणापूर देवस्थान हे जागतिक दर्जाचे असल्याने येथे मोठी गर्दी होत असल्याने साफ सफाई आणि स्वच्छता याची मोठी गरज निर्माण झाली आहे. यामुळे देवस्थान समितीने साफ सफाई कामासाठी वेळ मिळावा म्हणून रात्री साडे दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दर्शन बंद ठेवले आहे. तसेच भाविकांची गर्दी लक्षात घेता याच बैठकीतील निर्णयानुसार दि. 11 जून पासून पहाटे 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत तसेच सायंकाळ आरतीपूर्वी अर्धा तास व आरतीनंतर एक तास या कालावधीत शिंगणापूर येथील ग्रामस्थांना दर्शनासाठी स्वतंत्र ‘गावकरी गेट’ मंदिर कॅम्पसमधील महाद्वाराचे दक्षिण बाजूस असलेल्या रोडवरून सुरू होणार आहे. गावकर्यांना आधारकार्ड दाखवूनच गावकरी गेटमधून प्रवेश दिला जाईल. दर्शनास जाण्यासाठी गावकऱ्यांसमवेत अन्य बाहेरील भाविक भक्त यांना कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. याची सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री शनैश्वर देवस्थान शनिशिंगणापूरचे अध्यक्ष भागवत बानकर यांन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!