file photo

नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात असलेल्या शिरापूर गावात गाडे नावाच्या ७५ वर्षीय इसमाचा अज्ञात इसमाने खून केल्याची माहिती येत आहे.

या खुनाची माहिती मिळताच नगर एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पाथर्डीकडे रवाना झाले आहे.

शिरापूर गावापासून लांब आडरानात गाडे वस्ती आहे. गाडे कुटुंबातले सर्व सदस्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. वस्तीला राखण म्हणून ७५ वर्षीय गाडे (पूर्ण नाव समजल नाही) हे एकटेच वस्तीवर होते.

अज्ञात इसमाने या वयोवृध्द इसमाचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, नगर एलसीबीचे पथक घटनास्थळी गेलं असून तपास सुरु झाला आहे. मात्र या खुनाचा तपास करण्याचं पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभे राहिलं आहे.