Ahmednagar News : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मा.अध्यक्ष सत्याजीत (दादा) तांबे पाटील, तालुका काँग्रेसचे नेते राजेंद्र (दादा) नागवडे,जिल्हा समन्वयक काँग्रेस कमिटी ज्ञानदेव वाफारे साहेब,विठ्ठलराव वाबळे व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर दादा पोटे यांच्या शुभहस्ते अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पाडले.

यावेळी सत्यजीत तांबे यांनी बोलताना सांगितले की काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा एकमेव पक्ष आहे, त्यामुळे युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीचे काम या संपर्क कार्यालयातून मार्गी लागेल.

तसेच राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात हे नेहमीच राजकरणात येऊ इच्छिणाऱ्या नवीन युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे काम करतात. तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व जातीपातीचे राजकारण संपवण्यासाठी सध्या तरी युवकानं काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे.

यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक सुभाष (काका) शिंदे, नगरसेवक प्रशांत गोरे, नगरसेवक गणेश भोस, नगरसेवक समीर बोरा, नगरसेवक संतोष कोथांबिरे, नगरसेवक निसार बेपारी,नगरसेवक राजू लोखंडे,हृदय घोडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती महांडुळे काका, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन आदेश नागवडे,

मढेवडगांव सेवा संस्थेचे चेअरमन बापूसाहेब वाबळे,व्हा.चे. रावसाहेब जाधव, युवा नेते प्रमोद शिंदे, विद्यार्थि संघटनेचे तालुकाध्यक्ष आदिल शेख, शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस, युवक नेते प्रमोद म्हस्के,सो. मीडिया समन्वयक भूषण शेळके , गणेश श्रीराम, योगेश मांडे, विशाल पवार, कपिल नागवडे व असंख्य मित्रपरिवार उपास्थित होता.