जिल्ह्यातील एक मोठा मंत्रीही भ्रष्टाचारात अडकला ; विखेंचे सूचक विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोदहकांमध्ये आरोप – प्रत्यारोप यांची फेऱ्या सुरु आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी एक महत्वपूर्ण विधान केले आहे.

जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला आहे. कुणी किती ‘महसूल’ गोळा केला हे ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल, असे म्हणत त्यांनी नावाचा उल्लेख न करता थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत श्रीरामपूर येथे 60 वर्षांवरील नागरिकांसाठी वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते झाले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना विखे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले असून मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे.

जिल्ह्यातील एक मोठा मंत्री त्यात अडकला आहे. त्यांचे प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. याबाबत चौकशी सुरू आहे.

वास्तविक पाहता आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. असा माझा त्यांना सल्ला असल्याचे ते म्हणाले.