बेलापूर रस्त्यावर अपघात : तीन गंभीर जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : तालुक्यातील एकलहरे- बेलापूर हमरस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील तिन्हीही जण बेशुद्ध पडले होते. ही घटना काल शनिवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास एकलहरे गावाजवळ घडली.

या अपघातात एक पुरुष, दोन महिला गंभीर जखमी झाले. काही जखमी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील असल्याचे समजते.

एकलहरे गावाजवळ अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन त्वरित अपघातग्रस्तांना रिक्षातून श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालयात पाठविले; मात्र अपघातग्रस्तांची प्रकृती गंभीर परिस्थिती असल्याने त्यांना लोणी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातसमयी गावकऱ्यांबरोबरच प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. अपघातग्रस्त दुचाक्या घटनास्थळी पडून होत्या. याबाबत घटनेची बेलापूर पोलिसांना स्थानिकांनी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही दुचाक्या ताब्यात घेतल्या. बेलापूर पोलीस चौकीत नेण्यात आल्या.दुचाक्याचे नुकसान झाले.अपघातावेळी काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. त्यांनतर त्वरित जखमींना रुग्णालयात दाखल केल्यांनतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.