त्या दोषींवर कारवाई करावी : माजी आ.पिचड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-बुधवारी बारी घाटात रेशनिंगचे धान्य भरलेल्या गाड्या संशयास्पद जात असताना राजुर पोलीस व सामाजिक कार्यकतेंर्नी पकडल्या आहेत.

या घटनेतील मुळ आरोपींना शोधून दोषींना कडक शासन झाले पाहिजे. वाहतूक ठेकेदाराने खाजगी गाड्यात वाहतूक कशी केली ठेकेदाराचा हेतु शुद्ध नाही.त्यामुळे वाहतूक ठेकेदारावर गोडावून मधून धान्य चोरी करुन नेल्याचा गुन्हा दाखल करावा,

अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या तोडांचा घास,रेशनिंगचे धान्य संशयास्पद घेऊन जात असताना बारी गावाजवळील घाटात चार गाड्या माजी आ.पिचड यांचे कार्यकर्ते व पोलिसांनी बुधवारी पकडून राजूर पोलीस स्टेशनला आणले.

यावेळी पिचड यांनी स्वत: उपस्थित राहून चौकशी केली असता सदर गाड्या चालक व पुरवठा विभागाचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत होते.

यानंतर पिचड यांनी रात्री तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करुन तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल करावा व संबंधित कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी अन्यथा आपण कार्यालयातून उठणार नाही, अशी भुमिका घेतली.

त्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी चौकशी,पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र घटनेला २४ तास उलटूनही कारवाई झालेचे निदर्शनास न आल्याने पिचड आपल्या कार्यकत्र्यासमवेत तहसील कार्यालयात गेले.तहसिलदारांना निवेदन दिले.

यावेळी पिचड म्हणाले, जवळपास ५०० क्विंटल धान्य हे तालुक्यातील गोरगरिबांचे हक्काचे धान्य पळवण्याचा प्रयत्न होत आहे.या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.या प्रकरणात गोडावून किपर एकटा दोषी नसून त्यामागे मोठे षडयंत्र आहे. यातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.