दुकान लावण्याच्या वादावरून भिंगारमध्ये भावा बहिणीला टोळक्याकडून बेदम मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- भिंगारमधील संभाजीनगर परिसरात भाजी दुकान लावण्याच्या कारणावरून बहिण-भावाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणातील जखमी शरद पाथरे यांनी भिंगार पोलिसांना रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे…

बन्सी साधू पाथरे, सचिन बन्सी पाथरे, संदीप बन्सी पाथरे, मिरा सचिन पाथरे, जेसंता संदीप पाथरे, माया उर्फ साकाबाई बन्सी पाथरे (सर्व रा. माधवबाग, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी शरद पाथरे यांच्या संभाजीनगर येथील मालकीच्या गाळ्यासमोर आरोपी जमले.त्यांनी दुकानासमोर भाजी दुकान लावण्याच्या कारणावरून फिर्यादीसोबत भांडण करण्यास सुरूवात केली.

तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले, ही जागा माझी आहे. याचा राग येऊन बन्सी पाथरे याने त्याच्याकडील सत्तुरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांची बहिण सुनीता पाटोळे यांना दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

दरम्यान या मारहाणीत शरद बन्सी पाथरे (वय 43) व त्यांची बहिण सुनीता नितीन पाटोळे (वय 40 रा. माधवबाग, भिंगार) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.