नगरमधील कंपनीला सव्वा कोटीचा चुना लावणारी टोळी जेरबंद…! आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  येथील नागापूर एमआयडीसी येथील कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

सागर मोहन तुपे (रा. मुकुंदनगर, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान यापूर्वी पोलिसांनी अनिकेत अशोक माळी, आतिष विष्णू माळी (दोघे रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली) यांना अटक केली आहे. नागापूर एमआयडीसीत दर्शन ब्रिजलाल सोनी (वय ५६ रा. बुरुडगाव रोड, नगर) यांची विवेक पॉलीप्रॉडक्ट कंपनी व तिचे गोडाऊन आहे.

आरोपी त्या कंपनीत नोकरी करत असताना १ जून २०२० ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान वेळोवेळी त्यांनी टेम्पो मध्ये कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तू घेऊन जात सोनी यांची फसवणूक केली.

याप्रकरणी दर्शन सोनी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण पाच जणांविरुद्ध १७ डिसेंबर २०२१ रोजी फिर्याद दिली होती.

यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांच्या पथकाने आरोपी तुपे याला शेंडी (ता. नगर) शिवारातून अटक केली आहे.

दरम्यान या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.