Ahmednagar News : नगर शहरातील उड्डाणपुलावर अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या कारवर उड्डाणपुलाला आधार म्हणून लावलेल्या खांबाचा एक सिमेंटचा तुकडा निखळल्याने अपघात झाला. हा निखळलेला तुकडा चालत्या कारच्या काचेवर पडला.
नगर शहरातील पुणे रोडवरील कोठी येथे ही घटना सोमवारी (दि. ७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात कार चे नुकसान झाले परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेमुळे पुलाखाली बघ्यांनी एकच गर्दी केलेली होती.
नगर- पुणे रोडवरील कोठी चौक येथे माळीवाडा बसस्थानकाकडून कोठीकडे येत असलेल्या कारवर अचानक सिमेंटचा मोठा तुकडा पडला. चालकाने तातडीने कार बाजूला घेऊन पाहिले असता पुलाखालील खांबाचा सिमेंटचा एक तुकडा कारवर पडल्याचे दिसून आले.
हा सिमेंटचा तुकडा मोठा नगर शहरातील उड्डाणपुलाला आधार म्हणून लावलेल्या सिमेंटचा तुकडा चालत्या कारवर सोमवारी रात्री पडला होता. त्यामुळे कारचा वरचा भाग, तसेच काच फुटली. दरम्यान, या घटनेमुळे नगर-पुणे रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, अपघातामुळे पुलाखालील नगर-पुणे रोडवरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. अपघात झाल्याची माहिती मिळताच रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. त्यामुळे बराचवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या घटनेननंतर याबाबत कोतवाली पोलिसांशी एका मीडियाने संपर्क केला असता सिमेंटचा तुकडा पडून अपघात झाला आहे परंतु, यासंदर्भात तक्रार देण्यासाठी कुणी आले नसल्याचे सांगण्यात आले होते.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पुलावर अपघात झाल्याची बातमी शहरात पसरल्याने या मार्गावर मोठी गर्दी जमली होती. वाहतूकही काही वेळासाठी ठप्प होती.
नगर शहरातील उड्डाण पूल हा बहुप्रतिक्षेनंतर तयार झाला. यामुळे वाहतुकीची चांगली सोय झाली आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे येथे अपघातासारख्याही काही घटना येथे घडल्या आहेत.