Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ नागरिकांना ऐन उन्हाळयात महावितरणचा शॉक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News  : ऐन रखरखत्या उन्हात महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या कारवाईने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हारमध्ये महावितरण वीज कंपनीने विजेची चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

चार दिवसातच घरगुती व व्यापारी असे सुमारे ५८ विजचोरी करणारे ग्राहक पकडले असून त्यांना आता दंड आकरण्यात येणार आहे. महावितरण वीज कंपनीस वारंवार होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कोल्हार कक्ष कडून धडक कारवाई सुरू केली आहे.

कोल्हार बेलापूर रस्ता, विविध व्यापारी, रहिवासी संकुल व बाजारपेठे मधील अनेक वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळले. सदर ठिकानांवरील वीज मीटर काढण्यात आले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने विजचोरी केली होती.

त्यांना दुसऱ्या दिवशी नवीन मीटर लगेच लावून देण्यात आले. मात्र सोबत वीजचोरी केल्याचे पत्रसुद्धा त्यांना देण्यात आले. टेक्निकल बाबी तपासून कोणी किती वीज चोरी केली असेल त्याप्रमाणे त्यांना बिले देण्यात येणार आहेत.

सदर दंडात्मक बिल न भरल्यास त्यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक येथील भरारी पथक व देवळाली प्रवरा येथील उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हार सब स्टेशनचे कनिष्ठ अभियंता दिलीप गाडे, रवींद्र डौले, लक्ष्मण वाघ व सर्व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.