जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर पोलिसांनी बिंगो नावाचा जुगार खेळत असल्याच्या ठिकाणी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्याच्यांकडून सुमारे 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच जवळ काही इसम बिंगो नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी रविंद्र बाळासाहेब चव्हाण (वय 38) रा. नॉर्दन ब्रांच वार्ड नंबर 7 श्रीरामपूर,

अशोक एकनाथ खंडागळे (वय 31) रा. नवीन घरकुल वार्ड नंबर 1 श्रीरामपूर, बाबासाहेब शिवाजी कसबे (वय 19) रा.नॉर्दन ब्रांच वार्ड नंबर 7 श्रीरामपूर,

शाहरुख मुक्तार पठाण (वय 24) रा. मिल्लत नगर श्रीरामपूर यांना ताब्यात घेवून पोलिसांनी त्यांच्याकडून 23,880 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.