अहमदनगर ब्रेकिंग ! मला बदनाम करण्याचे षडयंत्र, विखेंनी ‘त्या’ चर्चांवर दिले स्पष्टीकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : समाजमाध्यमांमधून माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत माझी बदनामी करण्याचा हेतू आहे .

यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्वमिळाले आहे. राज्याचा निर्णय हा पंतप्रधान यांच्या स्तरावर झाला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत मंत्री विखे पाटील व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. जेपीसीच्या मागणीवरून राजकारण करणारे विरोधक, देशातील गुंतवणूकदारांचे झालेले अर्थिक नुकसान भरून देणार आहेत का?

असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. पुढे बोलताना विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा आलेख उंचाबत आहे. मोदींच्या कारकीर्दवर बोट ठेवायला विरोधकांना कोठेही बोट ठेवायला जागा नाही.

आज जगातील कित्येक भांडवलदार देश अडचणीत असताना भारतात खासगी उद्योगांच्या माध्यमातून होत असलेली गुंतवणूक, उद्योग व्यवसायाची प्रगती महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच भारताची प्रतिमा जगामाध्ये आज वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळत आहे; परंतु हिडनबर्गसारखी कोणतीतरी संस्था येऊन अहवाल देते आणि उद्योग समूहाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो.

यावर विरोधक राजकारण करीत आहे. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आहे. समितीचा काय अहवाल यायचा तो येईल; परंतु जेपीसीच्या मागणीवरुन संपूर्ण संसद आणि देशाला वेठीस धरण्याचे विरोधकांचे सुरु असलेले काम हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांचे हे कारस्थान कदापीही यशस्वी होणार नाही, असे मंत्री विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.