नाथसागर मधील ‘त्या’ महाकाय मगरीच्या मृत्यूचे कारण आले समोर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- १ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या मगरीचा मृत्यु हा फुफ्फुसातील संसर्गाने झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आला असुन न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे विभागीय वनआधिकारी अमितकुमार मिश्रा यांनी सांगीतले आहे.

ईको सेन्सटिव्ह झोन असलेल्या जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेञात शेवगाव तालुक्यातील खानापुर शिवारातील धरणाच्या काठी दि. १ फेब्रुवारी रोजी एक महाकाय मगर मृतावस्थेत आढळून आल्याने अ. नगर व औरंगाबाद वन्यजीव विभाग खळबळुन जागा झाला होता.

प्राथमिक सोपस्कर पार पाडल्यानंतर मगरीला पैठणच्या वनविभागाच्या कार्यालयात आणुन २ फेब्रुवारी रोजी त्या मगरीचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डाॅ. संजय गायकवाड, सहआयुक्त डाॅ. एस. के. खोसने यांच्या उपस्थीत पशुधनआधिकारी डाॅ. रोहीत धुमाळ, डाॅ. भुजंग यांनी मगरीचे शवविच्छेदन केले होते.

त्यानंतर वनविभागाचे विभागीय वनआधिकारी अमितकुमार मिश्रा, सहाय्यक वनसंरक्षक डाॅ. राजेंद्र नाळे, वनआधिकारी राजश्री बांगर यांनी वन्यजीव कायद्यानुसार त्या मृत मगरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, मात्र सदर मगरीचा मृत्यु कश्यामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालानंतर कळणार होते.