बारामती पर्व खोटे ठरले सर्व ..!

Ahmednagar Politics: एका वर्षापूर्वी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यात बक्षिसे म्हणून नथ, पैठणी दिले होते. परंतु ही नथ नकली होती,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच बारामती पर्व खोटे ठरले सर्व. असे टीकास्त्र माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह त्यांच्या मातोश्रीवर सोडले.

जामखेड येथे मकर संक्राती निमित्त हळदी – कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सौ. शिंदे या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मागील वर्षी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी महिलांसाठी जामखेड तालुक्यातील विविध गावात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Advertisement

यात विजेत्या महिलांना बक्षिसे म्हणून नथ व पैठणी दिले जात होते. परंतु ही नथ चक्क नकली असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे यापूर्वी आता तालुक्यात नवीन पर्व सुरू झाल्याची जोरदार घोषणा करण्यात येत होती.

मात्र प्रत्यक्षात बारामती पर्व खोटे ठरले सर्व असे झाले आहे, अशी टीका केली. या कार्यक्रमास तालुक्यातील हजारो महिलांचा सहभाग घेतला होता. या वेळी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या सौभाग्यवती माजी सभापती आशाताई शिंदे यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे तालुक्यात जोरदार चर्चा केली जात आहे.

Advertisement