जिल्ह्यातील ‘या’ बड्या कारखान्याची केंद्रीय पथकाकडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील श्री अंबालिका शुगर या खाजगी साखर कारखान्यावर केंद्रीय तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे.

विशेषबाब म्हणजे सकाळपासून हि चौकशी सुरु आहे. या पथकाकडून कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या भागात केंद्रीय सुरक्षा दलाचे पथक तैनात करण्यात आलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, केंद्रीय पथकाच्या चार ते पाच गाड्या आलेल्या आहेत. या पथकाकडून काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

मात्र ही चौकशी ईडी (ED) की आयकर विभागाकडून केली जात आहे याबाबत अद्याप स्पष्ट होत नाही. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कालच्या बारामती दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.