दिलासादायक ! नगर जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- कोविड-19 चा संसर्ग झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच कोरोना संकट संपू लागल्याचे संकेत मिळत आहेत. नवरात्र संपताच आणि दिवाळीआधीच नगर जिल्हावासीयांना खर्‍या अर्थाने पॉझिटिव्ह बातमी मिळाली आहे.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात फक्त 163 कोरोना बाधित आढळले. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असतानाच तिसर्‍या लाटेचा संकट टळलं असल्याचं दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ज्या गावात दहा पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत अशा गावात ग्रामीण लॉकडाऊन केला होता.

याचा ही परिणाम हळु हळु दिसू लागला आहे. प्रत्येक नागरिकांने नियमांचे पालन करत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतल्यास लवकरच नगर जिल्हा कोरोनामुक्त झालेला पहायला मिळेल.

यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनासंसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. असा हा आठवडा कोव्हिड-19 चा संसर्ग पसरल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे बाजारपेठा, दुकानं आणि मॉल उघडण्यात आलेत. चित्रपटगृह आणि नाट्यगृह येत्याकाही दिवसात उघडण्यात येणारेत. तर धार्मिकस्थळं लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

कॉलेज आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरांना मुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.