अखेर नगर शहरातील माउली सभागृहात रंगमंचाचा पडदा उघडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- करोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या निर्बंधा मुळे बंद असलेले नाट्यगृहे सुरु करण्याची परवानगी शासनाने दिल्यावर सावेडीच्या माउली सभागृह उघडून उत्साहात नटराज व रंगमंच पूजन करत सास्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात करण्यात आली.

जेष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत वेदोमंत्रोच्चारात नटराज पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पी.डी. कुलकर्णी म्हणाले, माउली सभागृह हे नगरमधील रंगकर्मींचे घर आहे.

गेल्या दोन वर्षापासून हे घर बंद असल्याची सल मनात होती. इडा पिडा टळो व पुन्हा नव्याने भरपूर याठिकाणी नाटके व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सतीश शिंगटे यांनी पडद्याचे पूजन केले, शशिकांत नजान यांनी रंगमंच पूजन, धनश्री खरवंडीकर यांनी तांत्रिक साहित्याचे पूजन केले. अमोल खोले यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी पवन नाईक, अविनाश कराळे, मनीष बोरा, शैलेश देशमुख, संजय आढाव, जालिंदर शिंदे, सागर मेहेत्रे, सभागृहाच्या व्यवस्थापिका सुषमा वीर, प्रतिक्षा सूर्यपुजारी, पंढरपूरकर गुरुजी, तेजस अतीतकर, राज जोशी, वसी खान आदी उपस्थित होते.