पुराच्या पाण्याने पशुपालकांचे मोठे नुकसान; जिल्ह्यात हजारो जनावरे दगावली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे नदी- नाल्यांना आलेल्या पुरात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच तब्बल अडीच हजार जनावरे पुराच्या पाण्याने दगावली आहे.

तर अद्यापही जिल्ह्यातील काही ठिकाणची अनेक गावे, वाड्यावस्त्या पुराच्या पाण्याखाली आहेत. नगर जिल्ह्यात शेवगाव-पाथर्डीसह अन्य ठिकाणी पूर आणि अतिवृष्टीमुळे 2 हजार 470 जनावरे दगावली आहेत.

त्यांना जिल्हा परिषदेमार्फत मदत देणे शक्य वाटत नाही. मात्र, वित्त आयोगाच्या निधीतून या दगावलेल्या जनावरांचे मालक असणार्‍या शेतकर्‍यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अर्थ आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभापती गडाख बोलत होते. दरम्यान, यावेळी केलवड येथील गायी दगावल्याचा विषय सदस्या शालिनी विखे पाटील यांनी उपस्थित केला.

त्या ठिकाणी असणारे जनावरांचे डॉक्टर यांनी लसीकरण न केल्याने मोठ्या संख्याने गायी दगावल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे संबंधित पशु पालकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण न करणार्‍या संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी त्यांनी केली. यावेळी प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिश्चंद्रे यांनी केलवडबाबत सभेत माहिती दिली.