अहमदनगर बातम्या

लाखोंच्या विकासकामांना सुरवात.., आ. नीलेश लंके म्हणतात विकासकामांत राजकारण केल्याने गावांचा विकास थांबतो..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वासुंदे गावाचे व माझे वेगळे नाते आहे. वासुंदे गावासाठी अद्याप पर्यंत वेगवेगळ्या निधीतून जवळपास १२ ते १३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु विकास कामे व राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून विकास कामात राजकारण आणता कामा नये. विकास कामात राजकारण आल्यास गावचा विकास खुंटतो अशी खंत आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली.

वासुंदे गावातील पाटील मळा येथील गांगड वस्ती ते ठाकर वस्ती या २० लाख रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार लंके यांच्यासह भागुजी झावरे व पोपटराव साळुंके यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बाळासाहेब खिलारी, प्रकाश राठोड, संजय रोकडे, रामभाऊ तराळ आदींसह गांगड मळ्यातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

यावेळी आ.लंके म्हणाले, ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी बऱ्याचवेळा ग्रामपंचायत ठरावाची गरज असते. परंतु स्थानिक पातळीवर राजकीय भावनेतून ग्रामपंचायत ठराव देत नाही. त्यामुळे विकास कामाला खीळ बसते.

परंतु राजकारण राजकारणाच्या ठिकाणी तर विकास कामे विकास कामांच्या ठिकाणी असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान यावेळी स्थानिकांनी आ. नीलेश लंके यांच्याजवळ वैयक्तिक भेट घेत अनेक समस्या मांडल्या. त्यावेळी त्यांनी त्वरित त्या सोडवण्यासाठी कार्यवाही केली.

  • बाळूमामा मंदिर जिर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी

  • वासुंदे गावातील पाटील मळा येथील बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गेले असता लोकसभागातून या मंदिराचा जिर्णोद्धार करावा अशी सूचना आ. लंके यांनी केली. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी १५ लाख रुपयांचा आमदार निधी त्यांनी यावेळी जाहीर केला.
Ahmednagarlive24 Office