नगर बाजार समिती : १८ जागांसाठी विक्रमी २२८ अर्ज, अर्ज माघारीसाठी नेतेमंडळींची दमछाक होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर तालुका कूषी उत्पन्न बाजार समिच्या २८ एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी (दि.३) शेवटच्या दिवसाअखेर १८ जागांसाठी विक्रमी २२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील ४२ अर्ज मागील ४ दिवसांत तर शेवटच्या एकाच दिवसात १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात दिग्गजांचा समावेश आहे. विक्रमी अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्यासाठी दोन्ही गटाच्या नेतेमंडळीची चांगलीच दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

नगर तालुका बाजार समिती निवडणुकीसाठी दि.२७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शुक्रवार दि.३१ मार्चपयंत ३५ जणांचे ४२ अर्ज दाखल झाले होते. तर सोमवारी (दि.३) एकाच दिवसांत १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे १८ जागांसाठी दाखल अजांची संख्या २२८ झाली आहे. या अजांची छाननी ५ एप्रिल रोजी होईल. वैध अजांची यादी ६ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल.

दि. २० एप्रिलपयंत अर्ज माघारीची मुदत राहील, अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप दि.२१ एप्रिल रोजी होईल व दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. त्यानंतर २९ एप्रिलला सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी सुरु होईल. सेवा सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण गटात ७ जागांसाठी ८४ अर्ज, महिला राखीवच्या २ जागांसाठी २० अर्ज, इतर मागास प्रवर्गाच्या १ जागेसाठी १७ अर्ज तर भटक्या जाती जमातीच्या राखीव १ जागेसाठी १३ अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण २ जागांसाठी ४३ अर्ज, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १ जागेसाठी १० अर्ज तर दुर्बल घटकासाठी राखीव असलेल्या १ जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी मतदार संघात २ जागा असून त्यासाठी १९ तर हमाल मापाडी मतदार संघात १ जागेसाठी १६ उमेदवारी अर्ज असे एकूण १८ जागांसाठी २२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या खरुषा सुप्रिया अमोल कोतकर, भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले, रोहिदास कर्डिले, माजी खासदार दादापाटील शेळके यांचे नातू अंकूश शेळके, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, उद्योजक अजय लामखडे, रेश्माताई चोभे, दीपक कार्ले, सुधीर भापकर, अशोक झरेकर, विलास शिंदे, रभाजी सुळ, दत्ता तापकीर, मंगलदास घोरपडे, बाबा खसें, भाऊसाहेब बोठे, सनी लांडगे, गुलाब शिंदे, राजू आंधळे, सत्यभामा कुलट, उद्धव दुसुंगे, रामदास सोनवणे, विजय शेवाळे, गोरख काळे, संजय जपकर, दिलीप भालसिंग, नंदकिशोर शिकारे, संजय गिरवले, विशाल निमसे, बहिरू कोतकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.