अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : ‘या’ गावात वेश्याव्यवसाय जोरात? महिलेची ग्रामस्थांवरच दादागिरी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर, समाजाला विघातक अशा कृतींवर नेहमीच कारवाई करत असतात. परंतु काहींची मुजोरी इतकी वाढलेली असते की ते त्यांनाही दाद देत नाहीत. असच काहीसे अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील टाकशीवाडी पोखरी बाळेश्वर येथे सुरु आहे का असा प्रश्न पडला आहे.

टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थांनी याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक राहत असून येथील एक महिला बऱ्याच वर्षापासून वेश्याव्यवसाय करते व करून घेते, यापूर्वी 9 डिसेंबर 2022 रोजी पोलीस प्रशासनाने छापा टाकून परप्रांतीय मुलींना पकडले व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती.

तरीही त्या महिलेने अद्याप वेश्याव्यवसाय बंद केलेला नाही त्यामुळे या महिलावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.

ही महिला तिच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना फोन, ऑनलाईन एसएमएस करून बोलवते व सदर महिलेकडे येणारे लोक हे मद्यपान व नशा करून येतात. या लोकांमुळे मुलींना व महिलांना शाळा कॉलेजला जाण्या येण्यासाठी रस्त्यावरून भीती निर्माण झाली आहे.

या महिलेमुळे आमच्या वस्तीतील महिला व मुलींना भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर महिलेला आम्ही सर्वांनी जाऊन समज दिली. परंतु उलट ही महिला दादागिरीची भाषा करते. आमच्यावरच खोटे आरोप करते आम्हाला जीवे मारण्याची धमकी देते आहे असे म्हटले आहे.

याबाबतघारगाव पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला असून तसेच विभागीय उपायुक्त संगमनेर यांनाही लेखी स्वरुपात पत्र दिलेले आहे. या महिलेवर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली आहे असे या ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office