अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : आत्महत्या करायला गेला आणी झाले शरीराचे दोन तुकडे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका शेतकऱ्याने विहिरीत गळफास घेतला. गळफास घेताना दोरीने मुंडके (डोके) बाजूला आणि गळ्यापासून पाया पर्यंतचे शरीर दुसऱ्या बाजूला झाले, अशी धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय ४५ वर्ष ) रा.पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे धांबोडी फाटा परिसरात भाऊसाहेब तोरमल हे गृहस्त राहत होते. व्यसनाधिनतेमुळे त्यांच्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती.

त्यामुळे, त्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केल्याची चर्चा सुरु होती. संपुर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा सुरु होती. कारण, धड वेगळे आणि मुंडके वेगळे असे ऐकल्यानंतर खरोखर ही आत्महत्या आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अकोले पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुमारे 60 ते 70 फूट खोल असणाऱ्या विहिरीत 40 फूट पाणी असून या पाण्यात त्याचे मुंडके शोधण्याचे काम सुरू आहे मुंडके नसलेले शरीर पाण्यातून वर काढले असून ते शरीर ग्रामीण रुग्णालय अकोले येथे तपासणीसाठी ठेवले असल्याचे अकोल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले.

रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घराच्या जवळच असणाऱ्या विहिरीकडे गेले विहिरीच्या कठड्याला एक नायलॉन दोरी बांधली. आणि आपल्या गळ्यात अडकविली त्यानंतर विहिरीच्या कठड्यावरून थेट विहिरीत उडी मारली विहिरीत उडी मारताच गळफासच्या दोरीने त्याचे मुंडके आणि मुंडके नसलेले शरीर असे दोन तुकडे झाले गळफासाची

दोरीने त्याचा गळा कापल्यामुळे शरीराचे दोन भाग झाले आणि विहिरीत पडले आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे अंगात फक्त अंतवस्त्र होते पाण्यात आवाज झाल्याने पत्नीने धाव घेतली असता पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती तिला समजली तिने आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी

धाव घेतली मयत तोरमल यांचा मृतदेह दुपारी तीन वाजता विहिरीतून बाहेर काढला असून त्याचे मुंडके नसलेले शरीर पोलिसांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी उत्तरीय तपासणीसाठी ठेवले आहे मात्र त्याचे मुंडके विहिरीतून अद्याप काढता नाही विहिरीत पाणी असल्याने विहिरीतील पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे आहे मुंडके मिळाल्यानंतरच त्याच्या शरीराचा शवविचेदन करता येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.