संगीत बहार गुरुकुलामध्ये ‘सूर निरागस हो’ नवोउपक्रमातून शिष्यांना रियाजाची लावली गोडी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  येथील संगीत बहार फाउंडेशनच्यावतीने गणेशोत्सव निमित्ताने गुरुकुल प्रस्तुत ‘सूर निरागस हो’ हा उपक्रम 10 दिवस घेण्यात आला.

या उपक्रमात शास्त्रीय संगीत शिकणार्‍या कलाकारांसाठी घरबसल्या आरासरूपी श्रीगणेशासमोर बसून दिवसभरात किमान 4 तास गायन-बासरीवादनाने गणेशाची भक्तीभावणेने सेवा करण्यात आली.

या उपक्रमात गुरुकुलातील साधक चित्रा गटणे, शर्मिला कंगे, बाबा भोर, योगेश तिवारी, शिवराज भोर, प्रणव दंडवते, आशिष गवळी, प्रशांत पटवा या साधकांनी आपली सेवा रुजू केली.

याप्रसंगी गुरुकुलचे जितेंद्र रोकडे म्हणाले, या उपक्रमामुळे स्वतःचा विकास व्हावा, रियाजात सातत्य निर्माण व्हावे, संगीताची गोडी निर्माण व्हावी, बैठक तयार व्हावी हा हेतू होता.

यात साधकांनी आपली भक्तीपुर्ण सेवा श्री गणेशा चरणी अर्पण केली. भविष्यात त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. जितेंद्र रोकडे यांनी या शिष्यांना 10 दिवस वेगवेगळ्या पध्दतीने मार्गदर्शनही केले.

ते नेहमी निरनिराळ्या पद्धतीचे उपक्रम घेवून शिष्यांना घडवत असतात. गुरुकुलातील काही शिष्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही पारितोषिके मिळवली आहेत.