हद्दच झाली ! नगर जिल्ह्यात होतीय सोयाबीनची चोरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर व भोकर परीसरातील शेतकर्‍यांच्या शेतातून काढणी झालेली सोयाबीन चेारीला जाण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

खोकर येथील एका शेतकर्‍याची ४८ हजाराची, तर भोकर येथील एका शेतकर्‍याच्या शेतातून ६५ हजाराची काढणी झालेली सोयाबिन चोरीला गेली आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोकर शिवारातील खोकरफाटा ते खोकर गावात जाणार्‍या रोडलगत शेती असलेले संदिप तात्यासाहेब खलाटे या शेतकर्‍याची शेतातील पत्र्याचे शेडची जाळी व शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करून या पत्र्याच्या शेडमधील काढणी झालेली ४८ हजार रूपये किमतीची सुमारे १२ ते १३ क्विंटल सोयबीन,

तीन हजार रूपये किमतीची टेक्स्मो कंपनीची काळ्या रंगाची थ्रीफेज केबल, तीन हजार रूपये किमतीची समरसेल कंपनीची इलेक्ट्रीक मोटार असा ५४ हजाराचा ऐवज घेवून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संदिप खलाटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रवींद्र पवार करत आहेत.