अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्याकास मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. राहुल जगन्नाथ देसले यांना मारहाण करण्यात आली होती.
सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांचा कार्यभार काढून घेतल्याच्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता.
त्यानुसार या घटनेतील मास्टरमाइंड ठरलेला विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ रघुनाथ शेटे यास राहुरी पोलिसांनी गजाआड केले.
ही घटना अतिशय संवेदनशील असून हल्लेखोरांविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे
यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लाखोरांना शोधण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी
या घटनेतील आरोपी भास्कर उर्फ माणिक नानासाहेब काचोळे यास घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेतले. त्याने संपूर्ण घटनाक्रम राहुल मदने, मुकुंद देशमुख यांच्यासमोर कबूल केला.
त्यानुसार शेटे याच्या सांगण्यावरून भास्कर उर्फ माणिक नानासाहेब काचोळे, तौफीक जमील देशमुख व परवेज सय्यद अशा चारही आरोपींनी हल्ला केला असल्याचे उघड झाले आहे.
काचोळे यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कटाचा प्रमुख सुत्रधार असलेला शेटे हा पसार झाला होता. त्यास काल पोलीस पथकाने अतिशय परिश्रम घेऊन पकडले असून त्यास अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com