अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- कोरोनामुळे प्रदीर्घ काळ बंद असलेले थेटर्स आता सुरु झाले आहे. यामुळे प्रेक्षकांची देखील थिटर्समध्ये गर्दी हाऊ लागली आहे. यातच सिनेमा सुरु असताना एक विचित्रच प्रकार घडलेला पाहायला मिळाला आहे.

सिनेमा सुरु असतानाच भोपाळमधील इजा चित्रपटगृहात रियल ऍक्शन सीन बघायला मिळाला. सिनेमागृहात सूर्यवंशी चित्रपटाचा शेवटचा शो सुरू होता. अक्षय आणि कॅटरीनाचा रोमँटिक सीन साधारणपणे 12 वाजता पडद्यावर आला.

यादरम्यानच, एका तरुणाने मागे बसलेल्या तरुणीशी अश्लील हावभाव केले आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. त्यांनतर संतापलेल्या मुलीने तिची सँडल काढून त्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली.

यानंतर प्रेक्षकही त्या तरुणावर तुटून पडले. आधी या सर्वांनी या तरुणाला चित्रपटगृहात चोप दिला. यानंतर चित्रपटगृहाबाहेर नेऊनही त्याची धुलाई करण्यात आली. मात्र, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही.

रोमँटिक सीन सुरू असतानाच घढला प्रकार –

अक्षय आणि कॅटरिनाच्या रोमँटिक सीनदरम्यान तरुणाने मागे वळून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. यावेळी त्याने ‘छोडो कल की बात…’, अशी कमेंट केली.

एवढेच नाही, तर तो वारंवार मागे वळून संबंधित तरुणीकडे बघत होता. यानंतर, तरुणीने आणि तेथील लोकांनी या युवकाला चोप दिला.