Best Budget Cars: भन्नाट मायलेज, स्टायलिश डिझाइनसह घरी आणा ‘ह्या’ कार्स ; किंमत 6 लाखांपेक्षा स्वस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Budget Cars: वाढत्या महागाईत तुम्ही देखील तुमच्यासाठी उत्तम मायलेज आणि भन्नाट फीचर्ससह येणारी स्वस्तात मस्त कार खरेदीचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे.

आम्ही तुम्हाला आज या लेखात देशात असणाऱ्या काही दमदार कार्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही 6 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या कारमध्ये तुम्हाला जबरदस्त मायलेजसह भन्नाट फीचर्स आणि स्टायलिश लूकही मिळतो. चला मग जाणून घेऊया या कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Alto K10

Alto K10 ही सध्याची देशातील सर्वात स्वस्त कार आहे. ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये येते. कारचे मायलेज देखील 20 किमीप्रति लिटर पेक्षा जास्त आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती रु.3.99 लाख एक्स-शोरूमपासून सुरू होते.

Alto K10 मध्ये कंपनीने Dual Jet VVT इंजिन वापरले आहे. यात ड्युअल एअरबॅग्ज, सीट बेल्ट प्रीटेन्शनर, बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी अनेक फीचर्स आहेत. तुम्हाला कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.

Renault Kwid

रेनॉल्टची क्विड तिच्या ट्रेंडी लुक्स आणि फीचर्समुळे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही हॅचबॅक असूनही मायक्रो एसयूव्हीचा अनुभव देते. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती 4.7 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 6.33 लाख रुपयांपर्यंत जाते. कार दोन ड्युअल टोन आणि 6 मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

KWID 1.0 पेट्रोल इंजिनसह ऑफर केले जाते जे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 22.3 kmpl प्रति लिटर आणि ऑटो ट्रान्समिशनमध्ये 21.4 किमी प्रति लिटर मायलेज देते. कारमधील 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यासारख्या फीचर्समुळे कार बजेट कार रेंजमध्ये विशेष बनते.

Tata Tiago

टाटाच्या हॅचबॅक टियागोनेही या लिस्टमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने कारमध्ये 1200 सीसीचे पेट्रोल इंजिन दिले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 20.09 किमी प्रति लिटर मायलेज देते.

Tiago चे CNG व्हेरियंट देखील बाजारात उपलब्ध आहे आणि ही कार 6.30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. Tiago चे CNG व्हेरियंट देखील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक किलो सीएनजीवर टियागो 26.49 कि.मी. चे मायलेज देते.

Celerio

मारुती Celerio मध्ये 1 लीटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार 26.6 किमी प्रति लिटर मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कारची सुरुवातीची किंमत 5.35 लाख रुपये आहे. कंपनी Celerio चे CNG व्हेरियंट देखील ऑफर करते. सीएनजीमध्येही याचे मायलेज सर्वाधिक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, कार एक किलो सीएनजीमध्ये 35.6 किमी धावू शकते. कार 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.

Hyundai i10 Nios

बजेट हॅचबॅक असूनही, Hyundai i10 Nios त्याच्या प्रीमियम फीचर्समुळे आणि लुकमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कार 5 ट्रिम आणि 6 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कारची सुरुवातीची किंमत 5.69 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

हे पण वाचा :-  काय सांगता ! अवघ्या 42 हजारांमध्ये मिळत आहे Samsung Galaxy Z Flip3 5G ; जाणून घ्या कसं