Car Discount : आपल्यापैकी अनेकांचे या चालू वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल. दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विशेषता ज्यांना होंडा कंपनीची कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही अपडेट मोठी कामाची राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी होंडाने आपल्या एका लोकप्रिय गाडीवर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे.
कंपनी या चालु मे महिन्यात आपल्या एका लोकप्रिय मॉडेलवर बंपर सूट ऑफर करत आहे. यामुळे ग्राहकांना कंपनीच्या या ऑफरचा फायदा घेऊन आपल्या कार खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण करता येऊ शकणार आहे.
आता आपण होंडा कंपनी आपल्या कोणत्या मॉडेल वर एक लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या कारवर मिळतोय एक लाखाचा डिस्काउंट
होंडा कंपनीने Honda Amaze या आपल्या लोकप्रिय कारवर जवळपास एक लाख रुपयांची डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून दिली आहे. मे महिन्यात ग्राहकांना Honda Amaze खरेदीवर तब्बल 96,000 रुपयांची सूट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र कंपनीकडून दिली जाणारी ही सूट या मॉडेलच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर भिन्न राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कंपनी Amaze च्या E वेरिएंटवर 56,000 रुपये आणि S आणि VX व्हेरिएंटवर 66,000 रुपयांची सूट ऑफर करत आहे. तर कंपनी Honda Amaze Elite Edition वर सर्वाधिक 96,000 रुपयांची सूट देत आहे.
Honda Amaze ची किंमत अन फिचर्स कसे आहेत बर?
कंपनीची ही जबरदस्त फीचर्स असणारी कार आहे. या कारच्या फिचर्च बाबत बोलायचं झालं तर यात ग्राहकांना 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील, ऑटो एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी फॉग लॅम्प्स, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स सारखे दमदार फीचर्स मिळत आहेत.
याशिवाय कारमध्ये काही जोरदार सेफ्टी फीचर्स देखील आहेत. यात सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग आणि रियर पार्किंग सेन्सर देखील देण्यात आले आहे. म्हणजे कंपनीची ही एक सेफ्टी कार आहे.
या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीची एक्स शोरूम किंमत सात लाख वीस हजारापासून सुरू होते आणि नऊ लाख 96 हजार रुपयांपर्यंत जाते. ह्युंदाई ऑरा, टाटा टिगोर आणि मारुती डिझायर या गाड्यांसोबत होंडा अमेझची स्पर्धा आहे.