Cars Price In India : आजच खरेदी करा ‘या’ कार्स; पूर्वीपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करता येणार, पहा संपूर्ण यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cars Price In India : कार खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन कार खरेदीदारांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण काही लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत कमालीची कपात केली आहे.

त्यामुळे नवीन कार खरेदीदारांना पूर्वीपेक्षा कमी पैसे देऊन कार खरेदी करता येणार आहे. यात मारुती सुझुकी, रेनो आणि किया या कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांच्या या निर्णयाचे कारण म्हणजे या कारची विक्री चांगली होऊ शकली नाही. त्यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मारुती सुझुकी कार 

हे लक्षात घ्या की मारुती सुझुकीच्या मे 2023 मध्ये SUV आणि MPV ची मागणी असल्याचे पाहायला मिळाले आहे. सुझुकीने मे 2022 मध्ये विक्री केलेल्या 1,19,315 युनिट्सच्या तुलनेत मागील महिन्यात मे 2023 मध्ये 1,18,500 युनिट्सची विक्री होऊन वर्ष-दर-वर्ष (YoY) विक्री कमालीची घसरली आहे. परंतु, असे जरी असले तरीही ती अव्वल स्थानावर कायम आहे.

किआ कार 

भन्नाट फीचरने समृद्ध असणारी लोकप्रिय कार निर्माता कंपनी Kia India च्या विक्रीतही थोडीशी घसरण झाली आहे. Kia ची विक्री मे 2022 मध्ये विक्री झालेल्या 17,355 युनिट्सवरून 16,819 युनिट्सवर आल्याचे समोर आले आहे. नुकतेच Kia’s Seltos ने 46 महिन्यांत 5 लाख युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली आहे.

रेनॉल्ट कार 

रेनॉल्ट इंडिया ही भारतीय बाजारपेठेत Kia नंतर तिसरी सर्वात कमी विक्री करणारी कार कंपनी आहे, मे 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 6,806 युनिट्सच्या तुलनेत केवळ 4,381 युनिट्सची किरकोळ विक्री करण्यात आली आहे आणि YoY डी-ग्रोथ नोंदवली गेली आहे.