Electric Car : भारतातील या आहेत शक्तीशाली इलेक्ट्रिक कार! खरेदीसाठी करावी लागू शकते इतक्या महिन्यांची प्रतीक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Car : देशात सध्या पेट्रोल किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. तसेच अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो बाजारात सादर करण्यात आल्या आहेत. मात्र त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

भारतीय बाजारात सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी वेगवेगळा प्रतीक्षा कालावधी आहे. जाणून घेऊया कोणत्या इलेक्ट्रिक कारला किती प्रतीक्षा कालावधी आहे…

एमजी कॉमेट

तुम्हीही एमजी कंपनीची कॉमेट इलेक्ट्रिक कार खरेदीचा प्लॅन बनवत असाल तर त्याआधी तुम्हाला या इलेक्ट्रिक कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. तुम्हाला जर लगेचच कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला मिळणार नाही. इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी तुम्हाला आगोदर बुकिंग करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ती कार दिली जाईल.

जर तुम्हाला एमजी कॉमेट इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र काही महिन्यांमध्ये तुम्हाला २ महिन्यांमध्ये ही इलेक्ट्रिक कार दिली जात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरु होते.

टाटा टियागो

टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर केल्या आहेत. ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. या कारची एक्स शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरु होते.

टाटा टिगोर

टाटा कंपनीची आणखी एक इलेक्ट्रिक कार म्हणजे टिगोर. ही एक सेडान इलेक्ट्रिक कार आहे. टाटा कंपनीकडून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये त्यांच्या अनेक कार सादर केल्या आहेत. ही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तुम्हाला तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. या कारची एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सकडून त्यांची सर्वाधिक विक्री होणारी नेक्सॉन कार देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर केली आहे. या कारला देखील ग्राहकांनाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असे तर तुम्हाला ४ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. या इलेक्ट्रिक कारची एक्स शोरूम किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरु होते.

महिंद्रा XUV 400

महिंद्रा कंपनीकडून देखील त्याची XUV 400 ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. महिंद्रा कंपनीची ही एकमेव इलेक्ट्रिक एसयूव्ही कार आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.