आनंदाची बातमी ! देशातील ‘या’ लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात, ग्राहकांना मोठा दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Scooter Price Drop : या नवीन वर्षातील इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नवीन वर्ष सुरू होऊन आता जवळपास 11 दिवसांचा कालावधी उलटला आहे.

दरम्यान या कालावधीत अनेकांनी नवीन वाहन खरेदी केले आहे. विशेष म्हणजे आगामी काळात अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत. अनेकांना या नवीन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे. अशातच आता 2024 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी Ather या प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपनीच्या माध्यमातून एक गुड न्यूज समोर आली आहे.

ती म्हणजे कंपनीने आपल्या लोकप्रिय ई-स्कूटरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. एथर एनर्जी या कंपनीने आपली लोकप्रिय स्कूटर Ather 450s च्या किमतीत 20 हजार रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या लोकांना नव्याने लॉन्च झालेली ही स्कूटर खरेदी करायची असेल त्यांना आता स्वस्तात ही गाडी विकत घेता येणार आहे.

यामुळे ग्राहकांच्या पैशात मोठी बचत होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ही स्कूटर गेल्यावर्षी लॉन्च करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेली ही स्कूटर ग्राहकांमध्ये हळूहळू लोकप्रिय देखील होऊ लागली आहे.

अशातच आता कंपनीने या स्कूटरच्या किमतीत 20 हजाराची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आता आणखी स्वस्त झाली आहे. यामुळे जर तुम्हालाही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर हवी असेल तर तुमच्यासाठी या स्कूटरचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमतीत कपात झाल्यानंतर आता ही इलेक्ट्रिक स्कूटर बेंगलोर मध्ये 1.09 लाख रुपयाला उपलब्ध होणार आहे तसेच राष्ट्रीय राजधानीत या स्कूटर ची किंमत 97 हजार पाचशे रुपये एवढी राहणार आहे. ही किंमत मात्र एक्स शोरूम प्राईस राहणार आहे.

अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. बेंगलोर मध्ये या स्कूटरची ऑन रोड किंमत एक लाख 17 हजार रुपये एवढी आहे तसेच राष्ट्रीय राजधानीत या स्कूटरची ऑन रोड किंमत 1.05 लाख रुपये एवढी आहे.

या ऑन रोड प्राईस मध्ये इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशनचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 115 किलोमीटर पर्यंत धावते. या गाडीचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.

हे स्कूटर 3.9 सेकंद मध्ये झिरो ते 40 किलोमीटर प्रती तास पर्यंतचा वेग पकडते. या स्कूटरची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी साडेसहा तासांचा कालावधी लागतो. या स्कूटरमधले सर्व हायटेक फिचर्स उपलब्ध आहेत.