Hero Electric Scooter: भारीच .. आता Flipkart वरून खरेदी करता येणार 95 किमी रेंज देणारी ‘ही’ भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर ; जाणून घ्या कसं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hero Electric Scooter: तुम्ही देखील या उन्हाळ्यात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही एका चार्जवर तब्बल 95 किमी रेंज देणारी Vida World ची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 घरी बसून Flipkart वरून खरेदी करता येणार आहे. होय, कुठेही न जात तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी बसून Flipkart वरून खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी Hero Electric च्या नवीन ब्रँड Vida World ने आपली बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच केली होती. तेव्हापासून या स्कूटरला बाजारात मागणी पाहायला मिळत आहे. या स्कूटरमध्ये कंपनी ग्राहकांना उत्तम रेंजसह भन्नाट फीचर्स देखील अगदी कमी किमतीमध्ये ऑफर करत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या पद्धतीने Flipkart वरून Vida V1 खरेदी करू शकतात.

Hero Electric Scooter On Flipkart

कंपनीची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केवळ ऑफलाइनच नाही तर फ्लिपकार्टवर ऑनलाइनही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊनही ही स्कूटर खरेदी करू शकता. तुम्हाला Vida V1 Pro ची किंमत Flipkart द्वारे भरावी लागेल.

यानंतर, तुम्हाला Hero MotoCorp च्या अधिकृत डीलरकडे जाऊन KYC कागदपत्रे जमा करावी लागतील, जेणेकरून विमा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर तुम्हाला विमा, RTO नोंदणी, एमिनिस्ट्रेशन एंड इंसीडेंटल चार्ज भरावे लागेल.  जर तुम्हाला शोरूममध्ये न जाता घरपोच Vida V1 Pro ची डिलिव्हरी हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल आणि तुम्हाला हीरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची तुमच्या घरी डिलिव्हरी मिळेल.

Hero Electric Scooter फीचर्स

आता आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या स्कूटरमध्ये उत्कृष्ट फीचर्स देखील दिले आहेत. त्याच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास, हीरो इलेक्ट्रिक स्कूटर 80kmph चा टॉप स्पीड देते, तसेच 3.2 सेकंदात 0 ते 40kmph पर्यंत वेग वाढवते. एकदा तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, तुम्हाला 95 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळेल.

Hero-Vida-V1

Hero Electric Scooter किंमत

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.39 लाख रुपये ठेवली आहे. म्हणूनच जर तुम्हाला एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल, तर हिरोची ही मस्त स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

हे पण वाचा :-   Chandra Grahan 2023: 5 मे रोजी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण ! ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..