Maruti Engage : शानदार फीचर्स, उत्तम मायलेज आणि शक्तिशाली इंजिनसह ‘या’ दिवशी लाँच होणार मारुतीची नवीन कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Engage : मारुती सुझुकी ही कार उत्पादक कंपनी मागील अनेक दिवसांपासून Engage या 7-सीटर कारवर काम करत होती. अखेर या कारच्या लाँचची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. येत्या 5 जुलैला ही 7-सीटर कार लाँच केली जाणार आहे.

जर किमतीचा विचार केला तर कंपनीची ही कार सर्वात महागडी 7-सीटर कार असणार आहे. इतकेच नाही तर कंपनीची आगामी कार इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असणार आहे. त्यामुळे या कारची किंमत खूप जास्त आहे. जाणून घेऊयात या कारचे फीचर्स.

मारुतीच्या ही आगामी तीन-पंक्ती MPV इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असणार आहे, जसे की यापूर्वी इतर अनेक मॉडेल्समध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वी कंपनीने टोयोटा हिरीडरवर आधारित ग्रँड विटारा सादर केली आहे. इनोव्हा हायक्रॉसच्या तुलनेत मारुती एंगेजच्या बाह्य डिझाइनमध्ये बदल करण्यात येऊ शकतात, परंतु या कारचा आकार जवळपास सारखाच असणार आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान मारुती सुझुकीच्या वार्षिक आर्थिक निकालाच्या पत्रकार परिषदेदरम्यान कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी असे सांगितले होते की, आम्ही सादर करत असणारे नवीन उत्पादन टोयोटाकडून घेतलेले वाहन असणार आहे आणि ते तीन-पंक्ती मजबूत-हायब्रिड मॉडेल असणार आहे. तसेच किमतीच्या बाबतीत ते अव्वल मॉडेल असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमधील ही सर्वात महागडी कार असणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, Maruti Suzuki Engage MPV फक्त 2.0-लीटर पेट्रोल इंजिनसह हायब्रिड मोटरसह उपलब्ध असणार आहे. हे इंजिन 172bhp पॉवर आणि 188Nm टॉर्क जनरेट करते, तर इलेक्ट्रिक मोटर अतिरिक्त 206Nm टॉर्क जनरेट करेल असे सांगण्यात येत आहे. हे इंजिन ई-सीव्हीटी ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडण्यात येणार आहे.

तसेच या कारच्या फीचर्स इत्यादींबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर केली नसली तरी यात 360 डिग्री कॅमेरा, एडीएएस, पॅनोरॅमिक सनरूफ, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल यासह काही फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. जे सिस्टमसह ऑटोमॅटिक ड्रायव्हर सीट आणि मेमरी फंक्शन समाविष्ट होऊ शकते.

किती असणार किंमत?

आगामी कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे त्यामुळे तिची किंमत जास्त असणार आहे. त्यामुळे लॉन्चपूर्वी त्याच्या किंमतीबद्दल सांगणे अवघड आहे. कंपनी 20 ते 25 लाख रुपयांच्या किमतीत मारुती Engage लाँच करेल असा दावा करण्यात येत आहे . हे लक्षात घ्या की मारुती सुझुकी ही कार त्यांच्या प्रीमियम NEXA डीलरशिपद्वारे विकणार आहे.