Sunroof SUV Cars In India : भारतातील ‘या’ आहेत बजेटमधील पॅनोरामिक सनरूफसह येणाऱ्या एसयूव्ही कार, पहा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sunroof SUV Cars In India : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या प्रीमियम फीचर्स असलेल्या कार सध्या उपलब्ध झाल्या आहेत. तसेच तुम्हीही पॅनोरामिक सनरूफसह येणाऱ्या कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक कार उपलब्ध आहेत.

सध्या ऑटो बाजारात पॅनोरामिक सनरूफसह येणाऱ्या कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल पाहायला मिळत आहे. खालील कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ आणि अधिक प्रीमियम फीचर्स दिले जातात.

मारुती ग्रँड विटारा

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या ग्रँड विटारा कारमध्ये देखील पॅनोरामिक सनरूफ दिले जात आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.41 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.83 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 103hp पॉवर जनरेट करते.

टाटा हॅरियर

टाटा मोटर्सच्या हॅरियर कारमध्ये देखील पॅनोरॅमिक सनरूफ दिले जात आहे. या कारमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 170hp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 17.90 लाख आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.27 लाख रुपये आहे.

टाटा सफारी

टाटा मोटर्सच्या सफारी XM(S) कारमध्ये देखील पॅनोरॅमिक सनरूफ दिले जात आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स दिले जात आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 18.66 लाख ते टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 25.22 लाख रुपये आहे.

ह्युंदाई क्रेटा

दक्षिण कोरियन कार निर्माता Hyundai कंपनीकडून त्यांच्या Creta कारमध्ये देखील पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात येत आहे. या कारमध्ये कंपनीकडून 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 115hp आणि 144Nm टॉर्क जनरेट करते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 13.96 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम 19.20 लाख रुपये आहे.

किआ सेल्टोस

किआ कार निर्माता कंपनीकडून 2019 मध्ये सेल्टोस कार सादर करण्यात आली आहे. तसेच आता जुलैमध्ये Seltos फेसलिफ्ट मॉडेल देखील सादर करण्यात आली आहे. या कारच्या HTK+ मॉडेलमध्ये पॅनोरामिक सनरूफ देण्यात येत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.00 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20.00 लाखांपर्यंत आहे.