Axis Bank MCLR Hike : जर तुम्ही Axis Bank चे ग्राहक (customer) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण अ‍ॅक्सिस बँकेने सीमांत खर्चावर आधारित व्याजदर (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढीव व्याजदर (Interest rate) तात्काळ लागू करण्यात आला आहे.

देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मानक MCLR (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 8.10 टक्के होता.

रेपो दरवाढीनंतर व्याजदरात वाढ झाली

वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्जाचे दर एका वर्षाच्या MCLR च्या आधारावर ठरवले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 30 सप्टेंबर रोजी रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर अॅक्सिस बँकेने MCLR दर वाढवला आहे. एक दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील MCLR देखील 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.15-8.30 टक्के करण्यात आला आहे.

या बँकांनी व्याजदरही वाढवले

MCLR दोन वर्षांसाठी 8.45 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.50 टक्के असेल. अॅक्सिस बँकेने सांगितले की, हे दर पुढील पुनरावलोकनापर्यंत वैध असतील.

याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने MCLR दरात वाढ केली होती. याशिवाय SBI ने मंगळवारी मोठी रक्कम जमा करणाऱ्यांसाठी व्याजदरात 0.3 टक्क्यांनी वाढ केली आहे.

एसबीआयने सोमवारी 10 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या बचत खात्यांवरील व्याज 0.50 टक्क्यांनी कमी करून 2.70 टक्के केले. एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, आता ग्राहकांना 10 कोटी किंवा त्याहून अधिक ठेवींवर 3 टक्के दराने व्याज मिळेल.