Soybean Bajarbhav : पामतेलाच्या दरात झाली वाढ ; म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात होतेय वाढ, अजून इतके वाढणार सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. जागतिक बाजारपेठेत पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीन बाजार भावात देखील सुधारणा होत आहे. निश्चितच यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचा चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

पामतेलाच्या किमतीत रोजाना वाढ होत असल्याने आज सोयाबीनच्या बाजारभावात 50 ते 100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही जागतिक बाजारपेठेत सोयाबीनला पाहिजे तसा उठाव पाहायला मिळत नाही. यामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात अजूनही दबाव पाहायला मिळत आहे.

खरं पाहता जागतिक बाजारपेठेत पामतेलाचे दर कमी जास्त होत आहेत. अशा परिस्थितीत सोया तेलाचे तसेच सोयाबीनचे बाजार भाव देखील कमी जास्त होत आहेत. कालच्या तुलनेत आज सोयाबीन बाजारभावात घसरण झाली आहे. मित्रांनो खरं पाहता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत होता.

अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीन काढण्यासाठी अडचण येत होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने सोयाबीन काढण्यासाठी देशात वेग आला आहे. महाराष्ट्रात देखील सोयाबीन हार्वेस्टिंग ची कामे जोरात सुरू आहेत. शिवाय यावर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असल्याने सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे.

एवढेच नाही तर उत्पादित झालेले सोयाबीन देखील जास्त काळ टिकवता येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन काढणी झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधव सोयाबीन विक्री करत आहेत शिवाय यावर्षी सोयाबीनची खेडा खरेदी वाढली आहे. अर्थातच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव गावातच येणाऱ्या व्यापाऱ्यांना सोयाबीन विकत आहेत.

दरम्यान उत्पादित झालेला सोयाबीन उच्च दर्जाचा नसल्याने सोयाबीनला कमी बाजार भाव मिळत आहे. पावसामध्ये सापडलेले सोयाबीन जुन्या सोयाबीन पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जे शेतकरी बांधव गावातच सोयाबीनची विक्री करत आहे त्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल ते 4700 रुपये प्रति क्विंटरपर्यंत बाजार भाव मिळत आहे.

व्यापाऱ्यांचा मते सध्या आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा देखा हे यामुळे कमी बाजार भाव मिळत आहे. दरम्यान एफएक्यू दर्जाचा सोयाबीनला 4900 रुपय प्रतिक्विंटल ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र आज सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढ झाली आहे.

अशा परिस्थितीत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधव सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी लक्षात ठेवून टप्प्याटप्प्याने विक्री करू शकतात. निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना तूर्तास तरी भाव वाढीची आशा आहे. मात्र यावर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यानच बाजार भाव मिळणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.