File Photo From Savita Bothepatil Facebook

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या पत्नी सविता बाळ बोठे यांनी माझ्या अंगरक्षकास एकरी उल्लेख करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. 

तुला माज आलाय का कोणाच्या आदेशाने तू पोलिस ठाण्यात फिरतोस ?

कोर्ट कामकाजाकरिता पारनेर येथे गेलो असता रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याची पत्नी तुला माज आलाय का, कोणाच्या आदेशाने तू पोलिस ठाण्यात फिरतोस ?

अशी विचारणा करीत सविता यांनी पोलिस ठाण्यात मोठ मोठ्याने आरडाओरडा केल्याचेही जरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

बोठे मला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत…

जरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अंगरक्षकास दमबाजी करून बोठे मला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बोठे यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर अंगरक्षकाने पोलिस निरीक्षक यांच्या दालनात जाऊन त्यांच्याकडे बोठे यांच्या वर्तणुकीविषयी माहिती दिली.

बोठे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

सविता यांनी पोलिस निरीक्षक यांच्या दालनात येऊनही आरडा ओरड केली. बाळ बोठे सध्या कोठडीत आहे, तो कोणाच्या मदतीने माझा काटा काढू शकतो याची मला कल्पना आहे.

अंगरक्षक यांना धमकावून सविता बोठे माझ्या कुटुंबावर दडपण आणित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जरे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.