Aadhaar Alert : आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे महत्त्वाचे कागदपत्र आपल्याकडे नसेल तर आपली अनेक कामे खोळंबु शकतात. त्याचबरोबर आधार कार्डवरून आपली फसवणूकही होऊ शकते.

तुम्ही तुमच्या आधार कार्डशी इतर कोणाचा मोबाईल नंबर लिंक आहे का? जर केला असेल तर आजच तपासून घ्या नाहीतर तुम्हीसुद्धा या फसवणुकीला बळी पडाल.

अशा प्रकारे, आधारशी कोणता क्रमांक जोडला गेला आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता:-

स्टेप 1 

तुमच्या आधार कार्डशी कोणते किंवा किती मोबाईल नंबर लिंक केले आहेत याबद्दल तुम्हाला गोंधळ होत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला दूरसंचार विभागाने जारी केलेल्या https://tafcop.dgtelecom.gov.in या पोर्टलला भेट द्यावी लागेल.

स्टेप 2

आता येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल जो आधारशी लिंक आहे. त्यानंतर येथे तुम्हाला ‘Request OTP’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3

यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, जो तुम्हाला येथे टाकावा लागेल. आता तुम्हाला तुमच्या आधारशी कोणते मोबाईल नंबर लिंक केले आहेत ते दिसेल.

स्टेप 4
हे पोर्टल तुम्हाला अशी सुविधा देते की जर स्क्रीनवर दाखवलेला कोणताही नंबर तुमचा नसेल आणि तुम्हाला तो काढायचा असेल तर तुम्ही येथून त्याची तक्रार करू शकता आणि तो काढून टाकू शकता.