file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा 15वा सिझन म्हणजेच ‘बिग बॉस ओटीटी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनचा प्रीमियर हा टीव्हीवर होणार नसून तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

या शोच्या पहिल्या सहा आठवड्याचे एपिसोड्स हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण यावेळी कार्यक्रमात मोठा बदल दिसून येणार आहे. नुकताच ईदच्या मुहूर्तावर कार्यक्रमाचा प्रोमो देखील जाहीर करण्यात आला होता.

गेली काही वर्षे बिग बॉसच सूत्रसंचालन करणारा अभिनेता सलमान खान नाही तर यावेळी बॉलिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यावेळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉस च्या प्रोमोत मात्र अभिनेता सलमान खान दिसून येत आहे.

दरम्यान डिजिटल स्पेस वर करण जोहर दिसणार असून टीव्ही वर सलमान खानच दिसणार आहे. या सिझन साठी अनेकांची नावं चर्चेत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी या कलाकांरांची नावही चर्तेत आहेत.

तेव्हा आता शो मध्ये नक्की कोण स्पर्धक असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रोमोमध्ये सलमान नव्या सिझनबद्दल माहित देताना दिसला.

या नव्या सिझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकही येणार आहेत. या लोकांची आणि सेलिब्रिटींची तगडी स्पर्धा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.