अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथील हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये असणाऱ्या हाॅटेल अंबिका वर धाड टाकून हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले असून दोन मुलीची सुटका केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अंबिका हाॅटेल केडगाव मध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके नगर शहर विभाग तसेच पोलिस निरीक्षक परदेशी सायबर पोलीस स्टेशन , पोलीस हवालदार निपसे ,पोलीस नाईक मिरपगार ,भालसिग,

पोलीस नाईक फसले ,काळे,जाधव , महिला पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांचे टीमने अंबिका हाॅटेल केडगाव मध्ये छापा टाकून अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार 02 मुलीची सुटका करून कुंटणखाना चालवणारे सचिन शिवाजी कोतकर रा, केडगाव व सुनिल मदन वानखेड़े रा, सारोळा ता,,जि अहमदनगर यांच्यावर कोतवाली पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर दाखल करण्याचे काम चालू आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment