अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : संगमनेर तालुक्यात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने पिता-पुत्रावर खुनी हल्ला केला. यामध्ये 55 वर्षीय इसमाचा चाकूने भोसकल्याने मृत्यू झाला आहे
या घटनेत 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडगावपान येथे काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे वडगावपानच्या संतप्त जमावाने हल्लेखोराच्या घराची तोडफोड केली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडगावपान येथील रहिवाशी असलेल्या दोन कुटुंबांमध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. एका तरुणाने दुसर्या तरुणास शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यामध्ये त्याचे डोके फुटले. हा वाद काल विकोपाला गेला. या वादाचे रूपांतर सायंकाळी चाकू हल्ल्यात झाले. एका तरुणाने दुसर्या कुटुंबातील 55 वर्षीय इसम व त्याच्या 25 वर्षीय मुलावर खुनी हल्ला केला.
यामध्ये 55 वर्षीय इसमावर अंगावर एका तरुणाने चाकूने सपासप वार केले. तर त्याच्या मुलावरही चाकूचे वार केले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनेच्या दिशेने धाव घेतली.
जखमींना उपचारार्थ संगमनेर येथे हलविण्यात आले. मात्र 55 वर्षीय इसमावर झालेल्या गंभीर वारमुळे त्यांच्या शरीरातून मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान हल्ला करणारा तरुण घटनेनंतर पसार झाला आहे.
या घटनेने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी हल्लेखोराच्या राहत्या घरावर हल्ला केला. त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला करून घराची तोडफोड केली.
त्यानंतर सदर नातेवाईक, ग्रामस्थ हे दवाखान्यात हजर झाले. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते. या घटनेला पोलीस अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews