भीषण अपघातात नगर जिल्ह्यातील चार तरुण ठार.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- नाशिक महामार्गावर शुक्रवारी ( दि . २५ ) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात बाबा ढाब्यासमोरील वळणावर एसटी बस व मारूती आय २० कार यांच्यात समोरासमोर धडक झाली.

या भीषण अपघातात कारमधील चारही युवक जागीच ठार झाले. अपघतानंतर बसने पेट घेतल्याने तीच्यातील १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. शिर्डी – नाशिक महामार्गावर शुक्रवारी ( दि . २५ ) रोजी रात्री मारूती कार ( क्र . एमएच १७ बीएस ७४६ ) नाशिककडून शिर्डीकडे येत होती.

सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारातील बाबा ढाब्यासमोरील वळणावर कार आली असता , शिर्डीकडून मुंबईकडे जाणाच्या शिर्डी – परळ निम आराम बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

यात कोपरगाव येथील सोनू चिने ( ३०,रा.जेऊर पाटोदा) , आकाश संजय पाटील ( २६ , रा.बालाजी आंगण, कोपरगाव),पंकज सुरेश वाळूज,(२८,लक्ष्मीनगर,कोपरगाव),सौरभ अशोक थोरात ( ३०,रा.जेऊर पाटोदा) हे चारही तरुण जागीच ठार झाले.

तर बसने पेट घेतल्याने १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील रुग्णालयात हलविले.

शनिवारी ( दि . २६ ) रोजी सकाळी ७ वाजता सिन्नर येथील सरकारी रूग्णालयातून हे चार मृतदेह कोपरगावात आणण्यात आले. सकाळी ११ वाजता कोपरगाव अमरधाम येथे तिघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

Leave a Comment