महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-स्थायी नंतर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी एक ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया होत आहे. स्थायी समिती सभापती पाठोपाठ स्वीकृतची निवड प्रक्रिया होत असल्याने महानगरपालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वीकृत नगरसेवकपदासाठी मनपाची सर्वसाधारण सभा झाली होती. परंतु, एकही शिफारस निकषात बसत नसल्याचे कारण देत

तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी गटनेत्यांच्या शिफारसी फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी निकषात बसणारी नावे देण्याचे ठरवून तशी मोर्चेबांधणी केली आहे.

स्वीकृत सदस्य निवडीमुळे इच्छुकांच्या आशा आकांक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. संख्याबळानुसार शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी 2 तर भाजपचा 1 सदस्य निवडून जाणार आहे. भाजपकडून सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले यांच्या नावाची चर्चा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24