Ahmednagar Breaking : पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला आहे. ही घटना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथे नुकतीच घडली होती . रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
विशेष म्हणजे या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव केला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.
विशेष म्हणजे त्यानंतर पतीने मृतदेह कापडात गुंडाळून घराशेजारी पुरून टाकला. संशय येऊ नये म्हणून पत्नी हरवल्याची तक्रारही त्याने पोलिसांत दिली होती. परंतु सत्य समोर आल्यानंतर सर्वांचं धक्का बसला आहे.
ही घटना श्रीगोंदे तालुक्यातील पारगांव सुद्रीक येथे घडली. ज्ञानदेव ऊर्फ माउली पोपट आमटे (वय 33, रा. पारगांव सुद्रीक, ता.श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव असून रुपाली ज्ञानदेव आमटे असे मृत पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी फरार आरोपीस गुजरातमधून बेड्या घातल्या आहेत.
फिर्यादी रोहित संतोष मडके यांनी त्यांची बहीण रुपाली हिचा पती ज्ञानदेव आमटे याने अनैतिक प्रेम संबंधाबाबत जाब विचारल्याचा रागातून खून केला व तिचा मृतदेह घराजवळ पुरळ आहे, परंतु त्याने हरवल्याची खोटी तक्रार दिली अशी फिर्याद दिली.
त्यानुसार 18/11/2023 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार त्यांनी एक पथक तयार केले. शोध घेत असताना गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जात आरोपीस ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तो कंत्राटी व्यवसाया निमित्त वेळोवेळी बाहेरगावी जात असल्याने पत्नी रुपाली ही त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन वारंवार वाद घालत असे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी रुपाली ही याच कारणावरुन वाद घालत होती.
त्याने रागाच्याभरात तिचे नाक तोंड, गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह घराजवळ खड्डयात पुरून टाकला. व ती हरवली असल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिल्याची कबुली त्याने दिली.