Cotton Rate : कापसाची शेती (Cotton Cultivation) आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) कापूस पिकावर अवलंबून आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Cotton Grower Farmer) एक दिलासादायक आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.

मित्रांनो या वर्षी कापसाच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. खरे पाहता गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव (Cotton Market Price) मिळाला. अशा परिस्थितीत यावर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचा दावा जाणकार करत होते.

झाल देखील असंच काहीसं, यावर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र विशेष वाढले आहे. मात्र असे असले तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. अतिवृष्टीच्या पावसामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) कापूस पिकास समवेतच जवळपास सर्वच पिके पाण्याखाली आली.

जास्तीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका कापूस पिकाला (Cotton Crop) बसला आहे. अशा परिस्थितीत कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार आहे. उत्पादनात घट तर होणारच आहे शिवाय यावर्षी पावसाचे आगमन बऱ्याच ठिकाणी उशिरा झाले असल्याने कापूस लागवडी देखील उशिरा झाल्या आहेत.

अशा परिस्थितीत कापसाचा हंगाम देखील या वर्षी उशिरा सुरू होणार आहे. कापसाची आवक बाजारात या वर्षी उशिरा येणार आहे. दरम्यान, जाणकार लोकांनी कापसाच्या दरात वाढ होणार असल्याचे भविष्यवाणी केली आहे.

मित्रांनो, यावर्षी राज्यात 42 लाख 29 हजार हेक्‍टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे लागवडीखालील वाढले आहे. दरम्यान सध्या बाजारात कापसाला सामान्य बाजारभाव असून गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर टिकून आहेत.

तसेच भारतीय हवामान विभागाने या माहितीनुसार यावर्षी परतीचा पाऊस हा लांबणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी देखील राज्यात पाऊस राहणार आहे. त्यामुळे या वर्षी नवीन कापूस बाजारात येण्यासाठी उशीर होणार आहे.

अशा परिस्थितीत नोव्हेंबरच्या आसपास कापसाचा बाजारपेठेत शॉर्टज निर्माण होईल आणि आवक कमी असल्याने कापसाच्या दरात वाढ होईल. असा अंदाज जाणकार लोकांकडून बांधला जात आहे.